'सरस्वती संगीत विद्यालय ' उभं आहे. गेली ८२ वर्षं ते तिथंच आहे. (बंगळूरु)
India /
Karnataka /
Bangalore /
बंगळूरु
World
/ India
/ Karnataka
/ Bangalore
जग / भारत / कर्नाटक /
निवास, शाळा, music school (en)

बेंगळुरूमधील श्यामला भावे यांचं घर म्हणजे संगीताचं मंदिरच आहे. या मंदिरामध्ये अनेक प्रतिभावंतांचे सूर आजही रेंगाळत असल्याचे जाणवते,या खोलीमध्ये भीमसेन जोशी , कुमार गंधर्व , पंडित रविशंकर यांच्यासारखे अनेकजण दोन दोन तास रियाज करून गेले आहेत. त्यामुळेच या खोलीत आम्ही कधीच जेवत नाही... ' श्यामला भावे सांगत होत्या. ते ऐकताना नजर त्या खोलीत फिरत होती. एका कोपऱ्यात श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती. मूर्तीच्या वरच्या भागातल्या भिंतीवर आईवडिलांची छायाचित्रे. मूर्ती आणि ती छायाचित्रे यांच्याभोवती दिव्यांची आरास. खोलीच्या साऱ्या भिंतीसुद्धा विविध प्रकारच्या पितळ्याच्या दिव्यांनी भरलेल्या. मध्येच एखादं काष्ठशिल्प. खोलीतल्या वातावरणातला वेगळेपणा त्या दिव्यांमुळे , कृष्णाच्या मूर्तीमुळे की त्या खोलीत आजही रेंगाळत असणाऱ्या स्वर्गीय सुरांमुळे ? ' आम्ही या खोलीत कधीच जेवत नाही ,' असं श्यामला भावे का म्हणाल्या त्याचा अर्थ आता उलगडतो. ती खोली म्हणजे अक्षय अशा सप्तसुरांचं जणू मंदिरच झालं आहे. त्यामुळेच त्या खोलीतलं वातावरण हे मनाच्या गाभ्याला पवित्र भावनेचा स्पर्श करून जाणारं आहे. अपवादानंच येणारा हा अनुभव मनात साठवत आपण खोलीच्या बाहेर येतो. मग लक्षात येतं , ती खोलीच नाही , तर नजर बांधून ठेवणारी प्रवेशद्वाराची चौकट ओलांडून आपण आतल्या खोलीत पाऊल टाकलं की तिथेसुद्धा नजर जाईल तिथं दिवेच दिसतात. पितळ्याचे दिवे. वेगवेगळ्या आकाराचे. घडणीचे. विविध प्रदेशांतून जाणकारीने आणलेले आणि त्याचा रसिकतेने संग्रह करणाऱ्या श्यामला भावे. हिंदुस्तानी संगीताचा वारसा जपतानाच मराठीची ध्वजा आजही डौलदारपणानं बेंगळुरूतल्या नेहरू चौकात फडकताना दिसते , ती श्यामला भावे यांच्यामुळेच. त्यांच्या बैठकीच्या खोलीतच नाही , तर डायनिंग टेबल असलेल्या खोलीच्या भिंतीसुद्धा नजर बांधून ठेवणाऱ्या दिव्यांनी भरलेल्या. कोणत्याही दिव्यावर धूळ नाही किंवा न हाताळल्या जाणाऱ्या पितळी वस्तूंवर येणारा हिरवा रंग नाही. सारे दिवे लखलखीत. संगीताचा दिवा तेजोमय ठेवणाऱ्या एका प्रतिभावंतानं प्रत्येक दिव्यागणिक जणू हरएक बंदिश , हरएक चीज हृदयस्थ ठेवली आहे , असं जाणवतं आणि त्या प्रत्येक दिव्यात दडलेलं एक अनोळखी रूप आपल्या अंतःचक्षूंपुढं उभं राहू लागतं...तसं ते राहत असतानाच श्यामला भावे आपल्या पलीकडच्या हॉलमध्ये घेऊन जातात. हॉलमध्ये आपण प्रवेश करतो आणि स्तब्ध होतो. कारण समोर दिसते सरस्वतीची मोठी मूर्ती. उंचावर ठेवलेली. ' सरस्वतीची पूजा केली जात नाही ,' असं सांगत भावे आपल्याला त्या मूर्तीपाशी घेऊन जातात. मूर्तीलगतच हार्मोनियम दिसतं. त्या खोलीतच सरस्वतीच्या मूर्तीसमोर , पण देवीच्या बैठकीपेक्षा कमी उंचीच्या आसनावर बसून श्यामला भावे आपलेपणानं बोलत राहतात. कर्नाटकात त्यांचं नाव खूपच मोठं आहे. ५०० डॉक्युमेंटरीज , एक कन्नड , एक कोंकणी आणि पाच संस्कृत चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय. मराठीमध्येही त्यांनी खूप काम केलंय. पण महाराष्ट्रात त्यांचं नाव फारसं पोचलंच नाही. अर्थात त्याची त्यांना खंत नाही. मनःपूत कलाकार आपल्याच विश्वात राहतो आणि आपल्या कलाजीवनाला सतत आकार देत ते अधिकाधिक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अखंड अध्ययन , सततची साधना आणि मनाची ऋजुता जपत ज्ञानदान हेच अशा मनस्वी कलाकारांचं भागधेय असतं. श्यामला भावे त्याला अपवाद नाहीत.
****बेंगळुरूमधला नेहरू चौक हा एक अत्यंत गजबजलेला भाग. सर्व रस्ते सतत वाहनांनी आणि माणसांनी भरलेले. अशाच ठिकाणी ' सरस्वती संगीत विद्यालय ' उभं आहे. गेली ८२ वर्षं ते तिथंच आहे. त्याच वास्तूमध्ये उभयगान विदुषी डॉ. श्यामला भावे राहतात. मराठीतील आद्य नाटककार विष्णुदास भावे हे त्यांचे पणजोबा. आजोबा विठ्ठल विष्णू भावे हे नामवंत चित्रकार होते. हिंदुस्थानी संगीतातील बंदिशींचा संग्रह त्यांनी तयार केला. वडील आचार्य पंडित गोविंद विठ्ठल भावे आणि विदुषी लक्ष्मी गोविंद भावे हेसुद्धा संगीतातले बुजुर्ग. आचार्य गोविंद विठ्ठल भावे (त्यांचंच नाव त्या रस्त्याला दिलं आहे.) हे पंडित पलुस्करांचे शिष्य. त्यांच्या सांगण्यावरूनच आचार्य भावे बेंगळुरूत आले. १९३० साली त्यांनी ' सरस्वती संगीत विद्यालया ' ची स्थापना केली. संगीताचा हा समृद्ध वारसा डॉ. श्यामला समर्थपणे चालवत आहेत. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांचा संगीताचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला. हिंदुस्तानी संगीत त्यांना नवे नव्हतेच ; पण कर्नाटकी संगीतामध्ये त्यांची तयारी ' गानसुधाकर ए. सुब्बा राव ' यांनी करून घेतली. या दोन्ही संगीतप्रकारातं त्यांनी असं काही प्रावीण्य मिळवलं की त्यावेळच्या म्हैसूर राज्याचे दिवाण आणि नामवंत इंजिनीअर सर एम. विश्वेश्वरय्या यांनी त्यांना ' उभयगान विदुषी ' अशी पदवी दिली. श्यामला भावे त्या पदवीला आजपर्यत जागल्या आहेत. त्यांचं घर हे मराठी-कानडी संस्कृतीचं माहेरघर बनलं आहे. त्यांचं घर अनेकार्थांनी संस्मरणीय आहे आणि त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व वंदनीय आहे!

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 12°59'16"N 77°34'36"E