तुंगारेश्वर डोंगरावर पुरातन महादेवाचे मंदिर

India / Maharashtra / Navghar /
 Upload a photo

तुंगारेश्वर डोंगरावर पुरातन महादेवाचे मंदिर असून वर्षभरात लाखो भाविक मुंबई, ठाण्यासह राज्यभरातून येथे येत असतात. श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीला तीन ते चार लाख भाविकांची गर्दी होते. हायवेवरून तुंगारेश्वर मंदिर साडेतीन किमी अंतरावर आहे. डोंगरवाट तुडवून भाविकांना मंदिरात जावे लागते.देवस्थान मंडळाकडे सध्या ३० एकर जमीन आहे. तुंगारेश्वर डोंगरावर येणाऱ्या पर्यटकांना सोयी-सुविधा मिळाव्यात ही गेल्या १० वर्षांपासूनची मागणी आहे. २००२ साली जिल्हा नियोजन समितीने श्री तुंगारेश्वर देवस्थान मंदिर 'क'वर्गीय पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले. मंदिराच्या आसपासचा तुंगारेश्वर परिसर २००३ साली अभयारण्य म्हणून घोषित झाला. २००७ साली जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तुंगारेश्वर पर्यटन स्थळाच्या विकासासाठी कामांचे अंदाजपत्रक बनवून जिल्हा नियोजन समितीला सादर केले. त्यामध्ये धर्मशाळा, दर्शन मंडप, गटार, रस्ते, रस्त्यावर विश्रांतीगृह अशा विकासकामांचा समावेश होता. मात्र, ही कामे झालीच नाहीत. मुंबई-अहमदाबाद हायवेपासून सीताराम बाप्पा मंदिरापर्यंत पालिकेने अलीकडेच डांबरी रस्ता तयार केला असला तरी पुढे तीन किमी डोंगरावर जाण्यासाठी किमान खडीकरण करावे, अशी मागणी आहे. मात्र वनविभागाकडून परवानगी मिळत नसल्याचे कारण सांगितले जात आहे.डोंगरावर जाण्यासाठी भाविक कच्च्या रस्त्याचा वापर करतात. पावसाळ्यात डोंगरावरील नाले भरून वाहत असल्याने वाहने जाऊ शकत नाहीत. वयोवृद्ध, लहान मुले, महिलांना अडचण होते. त्यामुळे या नाल्यावर बंधारे बांधण्याची मागणी सतत होत आहे. तुंगारेश्वर मंदिरात अद्याप वीज जोडणी नसून मंदिरातील दिवे जनरेटर व सौरऊर्जेवर सुरू आहेत.तुंगारेश्वर अभयारण्य हे २००३ मध्ये घोषित झाल्याने येथे कोणत्याही प्रकारचे वनेतर काम करावयाचे झाल्यास त्यासाठी केंद्र शासन तसेच सुप्रीम कोर्ट व राज्य, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची संमती घेणे जरुरीचे आहे. तुंगारेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता हा अभयारण्य क्षेत्रातून जात असल्याने हा रस्ता अद्याप झालेला नाही. गेल्या वर्षी देवस्थान मंडळाने सौरऊर्जेवरील दिवे १३ लाखांच्या खर्चाने मंदिर परिसरात लावले. पिण्याच्या पाण्याची, पार्किंगची, मंदिराकडे येणाऱ्या बसेसची सुविधा अद्याप झालेली नाही.डोंगर परिसर असल्याने येथे रात्रीच्या वेळी गैरप्रकार होत असतात. त्यामुळे येथे पोलिस चौकीचीही गरज आहे. या डोंगरावर निसर्ग पर्यटनासाठी वर्षभर पर्यटक, शाळा कॉलेजच्या सहली येत असतात. पावसाळ्यात येथे धबधबाही वाहतो.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°24'59"N   72°54'5"E
  •  27 किमी.
  •  110 किमी.
  •  127 किमी.
  •  207 किमी.
  •  432 किमी.
  •  598 किमी.
  •  839 किमी.
  •  875 किमी.
  •  945 किमी.
  •  1016 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी