औरंगाबादेतील थत्ते हौद हे एक ऐतिहासिक स्थळ (औरंगाबाद (संभाजी नगर))
India /
Maharashtra /
Aurangabad /
औरंगाबाद (संभाजी नगर)
World
/ India
/ Maharashtra
/ Aurangabad
जग / भारत / महाराष्ट्र / औरंगाबाद
नहरींचे शहर असलेल्या औरंगाबादेतील थत्ते हौद हे एक ऐतिहासिक स्थळ . बेगमपुऱ्यातील थत्ते यांच्या वाड्यात हा हौद आहे . नैसर्गिक झऱ्याद्वारे हौदात पाणी येते . हौदाच्या मध्यभागी कारंजाचे अवशेष आहेत . तेथून हौदात पाणी येते . सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचा हा हौद आहे .पूर्वज भगवानराव थत्ते हे पेशव्यांच्या दरबारात सरदार म्हणून कार्यरत होते. ते १७५० मध्ये कोकणातून औरंगाबादमध्ये आले. त्यांचा बीबी का मकबराच्या शेजारी राजेशाही बंगला बांधलेला होता. भगवंत नाईक थत्ते यांनी हौद बांधला . तेथे नहरीतून पाणी आणले . परिसरातील नागरिक , जनावरे यांची तहान भागविण्याचे काम या हौदाने अनेक वर्षांपासून केले आहे . हौदातील पाणी वापरणारी ही थत्ते यांची आठवी पिढी आहे . त्यांचे पूर्वज कोकणातील . पेशव्यांच्या काळात कोकणातील अनेक कुटुंबे देशावर आली . थत्ते यांचे पूर्वज पुण्यात आले . व्यापार , सावकारी हा त्यांचा व्यवसाय . पुढे आठव्या शतकात ते औरंगाबादेत येऊन सावकारी करू लागले . बिबी का मकबरा परिसरातील बेगमपुऱ्यात ते राहू लागले . सावकारीचा व्यवसाय भरभराटला . त्याकाळी सावकार टाकसाळ चालवित असत . त्या प्रथेनुसार पुढे त्यांनी दौलताबाद येथे टाकसाळही सुरू केली . सावकारीच्या व्यवसायामुळे भगवान थत्ते यांना लोक भगवान नाईक या नावाने ओळखू लागले . त्यांनी बेगमपुरा भागात स्वतःचे वाडे बांधले . तेथे उद्याने विकसित केली . त्यामुळे पाण्याची गरज भासू लागली .
बेगमपुऱ्यात पाणी आणण्यासाठी स्वतः नहर खोदण्याचा संकल्प भगवान नाईक यांनी केला आणि तो प्रत्यक्षात आणला . पाण्याच्या हौदाच्या काठावर फरसबंदी आहे . रस्त्यालगतच्या बाजूने नागरिकांना पाणी भरता येते . हौदाचे शिल्प घोटीव आहे . हौदाची लांबी , रुंदी ४२ फूट व खोली दहा फूट आहे . तळाला गिलावा करण्यात आला आहे . त्याचबरोबर चारही भिंतींच्या कडांना टिकाऊ गिलावा करण्यात आला आहे . त्यामुळे हौदातील पाण्याची ओल कधीही वाड्याच्या भिंतीत पसरलेली नाही . हौदाच्या चारही बाजूंनी नाल्या काढल्या आहेत . हौदातून ओसंडणारे पाणी नाल्यांमध्ये येते . तेथून ते एका लांबट कुंडात जमा होते . त्याठिकाणी जनावरांना पाणी पिण्याची सोय करण्यात आली आहे . हौदाच्या दोन्ही बाजूला वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत . डाव्या बाजूला चौकोनी मोरी आहे . गाळ काढण्यासाठी मोरीचा वापर केला जातो . बेगमपुऱ्यात गवळी समाजाची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे . त्यांच्या जनावरांना थत्ते हौदाचा मोठा आधार आहे . हौदाकडे तोंड करून उभे राहिल्यास समोर थत्तेवाड्याचा दर्शनी भाग आहे . उजव्या हाताला पंधरा फूट उंचीची भिंत आहे . भिंतीच्या पोकळीत जमिनीखालून पाणी येते . या भिंतीच्या हौदाकडील भागात कोनाडे आहेत . पूर्वी तेथे रात्री पणत्या लावण्यात येत असत . या हौदाचा १९७२ - ७३च्या दुष्काळात नागरिकांना मोठा आधार होता . या पाण्याने असंख्य कुटुंबांची तहान भागविली . त्याकाळी शहरात सर्कस येत होती . सर्कशीतील हत्तींना थत्ते हौदावर पाणी पिण्यासाठी आणले जात होते . पूर्वी अनेक घरांतून थत्ते नहरीचे पाणी खेळविण्यात आले होते . औरंगाबादच्या उत्तरेला सुमारे सहा मैलांवर इस्लामपूरवाडी नावाचे गाव आहे . तेथे हर्सूल नदीचे पात्र आहे . नदीच्या पात्रात विहीर खोदण्यात आली आहे . नदीतून झिरपणारे पाणी विहिरीत साठते . हेच थत्ते नहरीचे उगमस्थान आहे . कमाविलेल्या चुन्यात या नहरीचे बांधकाम करण्यात आले आहे . त्यासाठी पक्क्या विटांचा वापर करण्यात आला आहे . नहरीची लांबी दोन ते तीन मैल आहे . नहरीच्या मार्गावर अंतरा - अंतरावर कुंड बांधलेले आहेत . नहरीच्या साफसफाईसाठी कुंडातून नहरीत उतरता येते . नहरीत काही ठिकाणी एकावर एक अशा तीन स्वतंत्र नळांची व्यवस्था केली आहे . एकातील पाणी बंद झाले तरी दुसऱ्या नळातून पाणी सुरू राहते . सुमारे तीन मैलांनंतर हे पाणी खापरी पाइपमधून आणण्यात आले आहे . खापरी पाइपला ठिकठिकाणी दगडी किंवा विटांच्या बांधकामाचे संरक्षण दिलेले आहे . नहरीच्या उगमापासून बेगमपुऱ्यातील हौदापर्यंत आठ मनोरे आहेत . त्यांच्याखालून नहरीचे नळ गेलेले आहेत . मनोऱ्यांचे बांधकाम जुन्या पद्धतीचे आहे . त्याला बाहेरील बाजूने विटकरी गिलावा करण्यात आला आहे . काही मनोऱ्यांवर चढण्यासाठी दगड बसविण्यात आले आहेत . या मनोऱ्यांना ' बंबा ' म्हणून ओळखले जाते . मूळ झऱ्यापासून पाण्याचा प्रवाह सुरू होतो , तेथे पहिला बंबा चौरस आकाराचा आहे . त्याला चौरस बंबा म्हणून ओळखले जाते . तेथे पाणी खूप उंचीवर चढते . बंबांच्या तळाशी केरकचरा , गाळ काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे . तेथून पुढे नहर हाथनी बंबांकडे सरकते . नहरीत जमिनीत टाक्यांसारखी व्यवस्था करण्यात आली आहे . हाथनी बंबांनंतर गोल बंबा आहे . तेथे हत्तीच्या सोंडेसारखी पाण्याची धार वेगाने खाली पडते . तेथून पाण्याचा पाट वाहतो . गोल बंबांच्या पुढे शहराकडे येणाऱ्या मार्गावर डोंगर आहे . या डोंगरावरून पाणी पुढे आणणे हेच भगवान थत्ते यांच्यासमोर आव्हान होते . हे काम गोल बंबाने केले . नहरीच्या मार्गावर डोंगर माथा फोडून एक खिंड केलेली आहे . या खडकातून नहर पुढे जाते . खडकात चर खणून तो बांधून काढण्यात आला आहे . या खिंडीची लांबी सुमारे १६० फूट आहे . खिंडीच्या तोंडाशी एक कुंडासारखी झडप आहे . ती उघडून आत प्रवेश करता येतो . खिंडीची साफसफाई करण्यासाठी ही व्यवस्था आहे . त्याचबरोबर खिंडीत उजेड पडावा म्हणून तोंडाशी एक झरोका करण्यात आला आहे . त्याला रोशनदान म्हणून ओळखले जाते . खिंडीच्या तोंडाशी एक चौकोने टाकी आहे . उंच खिंडीतून येणारे पाणी तेथे पडते . या टाकीच्या खाली एक लहान टाकी करण्यात आलेली आहे . या टाकीला पारशाचा बंबा म्हणून ओळखले जाते . त्यानंतर शुभकरण बंबा लागतो . तेथून पाणी बेगमपुऱ्यातील कुंभार बंबा येथे जाते . त्यानंतर पाटील बंब्यातून सहा दिशांना पाणी पुरवठा करण्यात येतो . त्यासाठी खापरी पाइपची व्यवस्था करण्यात आली आहे . त्यातील एक नहर बिबी का मकबऱ्यात नेण्यात आली आहे . यंदाच्या दुष्काळात हर्सूल तलाव आटला . या तलावाच्या पाणलोटात ( बॅकवॉटर ) इस्लामपूरवाडी येथील थत्ते नहरीची विहीर आहे . यंदा विहीर आटल्यामुळे थत्ते नहरीतून येणारा पाण्याचा प्रवाह थांबला . त्यामुळे इतिहासात प्रथमच थत्ते हौद कोरडा पडला . १९७२ - ७३च्या दुष्काळात नागरिकांची आणि गुराढोरांची तहान थत्ते हौदाने भागविली . त्यानंतर थत्ते कुटुंबियांनी हा हौद पुरातत्व खात्याकडे सोपविला

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 19°53'46"N 75°19'4"E
- enginiring work shop 1 किमी.
- Vanaspati Udyan (Botanical Garden) 1.1 किमी.
- Jadhav Home 1.3 किमी.
- piyush apartment.. Bhimrao sarwade & Arjun sarwade's flat 1.9 किमी.
- Mr. Anil Pande's Niwas 0.1 किमी.
- Chawdi Maidan Primay Schoool 0.2 किमी.
- Law boys hostel 0.8 किमी.
- paddmpani boys hostel 1.1 किमी.
- Piyush Apartment 1.9 किमी.
- हनुमान टेकडी 2 किमी.