श्रीहरी बालाजी मंदिर (चिमुर)

India / Maharashtra / Umred / चिमुर
 हिंदू मंदिर  गट निवडा
 Upload a photo

कथा आहे इ. स. १७०४ ची. चिमूर येथील शेतकरी भिकुजी डाहुले पाटील यांनी जनावराच्या गोठय़ासाठी जमीन खणायला सुरूवात केली असता एके ठिकाणी कुदळ आदळले आणि धातूसारखा आवाज आला. भिकू पाटील यांनी खोदणे थांबवले. त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नानुसार त्यांनी पुन्हा जमीन खोदण्यास सुरूवात केली आणि तिथे एक सुंदर मूर्ती वर आली. तिची प्रतिष्ठापना त्याच ठिकाणी करण्यात आली, अशी अख्यायिका आहे. पुढे इ. स. १७५७ मध्ये जानोजी भोसले यांनी पेशव्यांचे सरदार देवाजीपंत चोरघडे यांच्या विनंतीवरून चिमूर इथे २०० एकर जमीन मंदीर उभारण्यासाठी दिली. तटबंदीयुक्त प्रासाद असलेल्या मंदिराला उंच प्रवेशद्वार असून त्यावर कोरीवकाम केलेले आहे. लाकडी सभामंडपाला १२ खांब आहेत. त्यावर हत्ती, वाघ अशा प्राण्यांची चित्रे कोरलेली आहेत. याच्या पुढे चार दगडी खांब असलेला अजून एक सभामंडप आहे. त्याला वर आधारशिळा बसवलेल्या आहेत. बालाजीची मूर्ती बरीचशी तिरुपतीच्या मूर्तीसारखीच आहे. मंदिराच्या आवारात एक गरुड खांब असून बाहेर काही पुजारी मंडळींच्या समाध्या दिसतात. या ठिकाणी माघ शुद्ध पंचमीला बालाजीची घोडायात्रा भरते. एका रथावर लाकडी घोडा ठेवून त्यावर बालाजीच्या मूळ मूर्तीची लाकडी प्रतिकृती ठेवतात व त्याची मिरवणूक काढली जाते. इतके महत्त्वाचे देवस्थान आपल्या राज्यात आहे, याची स्थानिकांव्यतिरिक्त इतरांना फारशी माहिती नाही. विदर्भातील पर्यटनात एक दिवस राखून ठेवून चिमूरच्या बालाजीचे दर्शन घेता येईल.
गोविंदा .... गोविंदा .... च्या गजरात निघालेल्या भव्य घोडायात्रेने चिमूरनगरी दुमदुमली . तब्बल पाच तास चालललेल्या या घोडायात्रेत हजारो भाविक सहभागी झालेत . लाकडी घोडा चारचाकी रथावर ठेवण्यात आला . घोड्यावर स्वार मुद्रेत श्रीहरी बालाजीची काष्ठ प्रतिमा विराजमान होती . ढोल - ताशे , भक्तीसंगीत व प्रचंड भाविकांच्या उपस्थितीत शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता यात्रेला सुरुवात झाली . रविवारी पहाटे साडेपाचपर्यंत यात्रेचे मार्गक्रमण सुरू होते . श्रीहरी बालाजी मंदिरासमोर योत्रेचा समारोप झाला . चिमूरवासियांसाठी घोडायात्रा म्हणजे दिवाळी पेक्षाही मोठा सण असतो .
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°29'33"N   79°22'10"E

प्रतिक्रिया

  • विनंती केली आहे की, मुर्ती वैशिष्ट्ये लेख अपलोड करा
  •  53 किमी.
  •  96 किमी.
  •  187 किमी.
  •  223 किमी.
  •  244 किमी.
  •  310 किमी.
  •  448 किमी.
  •  468 किमी.
  •  665 किमी.
  •  811 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी