किर्लोस्करवाडी

India / Maharashtra / Ashta /
 खेडेगाव  गट निवडा
 Upload a photo

वाडीतल्या सोशल क्‍लबमध्ये अनेक नामवंताची भाषणे व कार्यक्रम होत. जगन्नाथराव जोशी, राम केशव रानडे, शांता शेळके, ग. दि. माडगूळकर, सुधीर मोघे, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांची भाषणे व बांगला देश मुक्तीनंतर सॅम माणेकशॉं यांचा झालेला सत्कार व त्यांची जोशपूर्ण वाणी, ह्या गोष्टी आयुष्यांत विसरता येणार नाहीत. शांता शेळके यांच्या बरोबर कवितेविषयी केलेली चर्चा व त्यांचा साधेपणा मला कायमचा स्मरणात राहिला. राम नाईक यांची सामान्याविषयीची तळमळ नजरेत भरली. राम केशव रानडे यांच्या आध्यात्मिक विचाराने नवी दिशा मिळाली. हे साहित्यातील आनंदाचे क्षण "किर्लोस्करवाडीनेच' दिले!

एकदा काही कामानिमित्त शंतनुराव किर्लोस्करांना भेटण्याचा प्रसंग आला. काही कामामुळे त्यांना त्यांनी दिलेल्या वेळेपेक्षा भेटण्यास थोडा उशीर झाला. त्या वेळी त्यांनी वेळेच्या नियोजनाविषयी सांगितलेल्या गोष्टी खरे तर आयुष्यभर विसरता येण्यासारख्या नाहीत. "वेळ एक अमूल्य ठेवा' हा त्यांनी सांगितलेला मंत्र मी आयुष्यांत जपण्याचा प्रयत्न केला.

कंपनीच्या "विकास चॅरिटेबल ट्रस्ट'मध्येही स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संस्थेतर्फे आदर्श शाळा पुरस्कार दरवर्षी देण्यात येऊ लागला. अनेक शाळांची तपासणी करण्याची संधी व शिक्षकांचे अनुभव ऐकण्याचा अमूल्य ठेवा गवसला. ग्रामीण भागातली कराडजवळील तळमावले येथील उत्कृष्ट शाळा पाहण्याची व त्यातील अनेक योजना सभोवतालच्या शाळेत अनेक शिक्षकांनी राबविल्याचे पहावयास मिळाले. किर्लोस्कर वाडी येथील नागरिकांकडून घरात असलेली खेळणी गोळा करून ती जवळच्या बालवाड्यांना देताना मन खरेतर आनंदाने भरून आले. कोल्हापूर येथील अनाथाश्रमास वह्या व पुस्तकांची मदत करताना व छोट्या अनाथ मुलांना पाहून मनांत विलक्षण कालवाकालव झाली. जीवनांतील हाही एक विलक्षण अनुभव होता.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   17°4'59"N   74°25'15"E
  •  183 किमी.
  •  279 किमी.
  •  340 किमी.
  •  409 किमी.
  •  499 किमी.
  •  535 किमी.
  •  572 किमी.
  •  651 किमी.
  •  711 किमी.
  •  725 किमी.
This article was last modified 8 वर्षांपूर्वी