नांदगाव रेल्वे स्थानक (नांदगाव)

India / Maharashtra / Nandgaon / नांदगाव
 रेल्वे स्थानक  गट निवडा
 Upload a photo

रेल्वेचे रनिंग रूम म्हणजे रेल्वे चालवून दमलेल्या रेल्वे चालकांचे व सोबतच्या गार्डसचे विश्रांती स्थानच. मात्र नांदगावमध्ये केवळ रेल्वे चालकांना आराम करण्यासाठीची जागा एवढेच त्याचे स्वरूप न ठेवता चालकांची तब्येत ठणठणीत व एकदम सुदृढ राहण्यासाठी अत्याधुनिक जिम तयार करण्यात आली आहे. रेल्वेच्या निकामी झालेल्या टाकाऊ भंगार वस्तूंमधून ही ग्रीन जिम निर्माण केल्याने दहा ते बारा हजारांचा खर्च आला आहे.

नांदगाव रेल्वे स्थानकावर करण्यात आलेला हा प्रयोग जरा हटके असून, त्याला शनिवारी (दि. ६) नांदगावला पाहणीसाठी आलेल्या रेल्वे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांच्याकडून २५ हजारांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. येथील लोको फोरमन ए. जी. गोरे यांच्या कल्पकतेतून जिमला मूर्तरूप मिळाले. रेल्वे चालकांसाठी जिमयुक्त रनिंग रूम कौतुकाचा विषय ठरला असून, सर्वांसाठी आदर्शवत ठरण्याची शक्यता आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°18'37"N   74°39'40"E
  •  104 किमी.
  •  214 किमी.
  •  216 किमी.
  •  228 किमी.
  •  482 किमी.
  •  554 किमी.
  •  841 किमी.
  •  905 किमी.
  •  1001 किमी.
  •  1019 किमी.
This article was last modified 7 वर्षांपूर्वी