गिरगाव चौपाटी

India / Maharashtra / Mumbai /
 समुद्र किनारा, पर्यटन आकर्षण

गिरगाव चौपाटीवर नागरिकांकडून, तसेच समुद्राच्या लाटांद्वारे येणारा दररोज सहा हजार किलो कचरा गोळा होतो. चौपाटीवर यापूर्वी स्वच्छतेसाठी मशिन वापरण्यात येत होते. मात्र, त्याचे काम अत्यंत हळू होते. नव्या जर्मन मशिनची ओल्या वाळूत कार्य करण्याची क्षमताही लक्षणीय आहे. त्यामुळे कमी वेळेत अधिक चांगल्याप्रकारे चौपाटीची स्वच्छता करणे पालिकेला शक्य झाले आहे. यंदाच्या ऑक्टोबरपासून पालिकेने हे मशिन वापरण्यास सुरुवात केली आहे. हे मशिन आठवड्याचे सातही दिवस व २४ तास कार्यरत ठेवण्यात येत आहे. संध्याकाळी चौपाटीवर गर्दी असल्याने मशिनचा मर्यादित वापर केला जात आहे. या मशिनमुळे चौपाटीवरील वाळू भुसभुशीत व मऊ राहण्यास मदत होत असल्याचे पालिकेचे असिस्टंट इंजिनीअर गुरव यांनी सांगितले.असा होतो कचरा गोळा मशिनच्या खाली असणारी पाती सहा इंच वाळूच्या खाली जाऊन वाळूच्या वरील व आतील बारीक कचरा बाहेर काढते.
मशिनमध्येच असणाऱ्या जाळीवरून तो कचरा फिरवला जातो.कचरा व वाळू वेगळे होऊन कचरा मशिनच्या मागे असणाऱ्या कंटेनरमध्ये साठविला जातो. तर वाळू पुन्हा चौपाटीवर टाकली जाते.
वाळू सातत्यामुळे वरखाली होत असल्यामुळे चौपाटीवरील वाळूचा थर मऊशार व भुसभुशीत राहण्यासही मदत होते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°57'9"N   72°48'47"E
  •  31 किमी.
  •  105 किमी.
  •  155 किमी.
  •  258 किमी.
  •  458 किमी.
  •  592 किमी.
  •  803 किमी.
  •  834 किमी.
  •  900 किमी.
  •  979 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी