Kanherkhed

India / Maharashtra / Rahimatpur /

Village Kanherkhed
ग्वाल्हेरचे संस्थान हे मराठा साम्राज्यातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान होते. राणोजी शिंदे हा या संस्थानाचा संस्थापक पुरुष होता. या संस्थानाची राजधानी पूर्वी उज्जैन (दार-उल-फतेह) होती, पण नंतर ग्वाल्हेर हेच राजधानीचे ठिकाण झाले.

ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे यांच्याप्रमाणेच महादजी शिंदे अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती होते. ते राणोजींचे सर्वात छोटे चिरंजीव होते. राणोजी इ.स १७५० मध्ये मृत्यू पावले. महादजी शिंदे इ.स. १७६१ मध्ये सत्तेवर आले. या घराण्यातील शासक खालीलप्रमाणे :

जयाप्पाराव (इ.स १७५०-१७६१)
महादजी शिंदे (इ.स. १७६१-१७९४)
दौलतराव (इ.स. १७९४-१८४३)
बायजाबाई (दौलतरावांची विधवा पत्नी, इ.स. १८२७-१८३३)
जनकोजी (इ.स. १८८६-१९२५)
जयाजीराव (इ.स. १८४३-१८८६)
माधवराव (इ.स. १८८६-१९२५)
जिवाजीराव (इ.स. १९२५-१९४८).
माधवराव शिंदे व ज्योतिरादित्य शिंदे हे भारतीय प्रजासत्ताकातील राजकारणी याच घराण्यातील आहेत. ग्वाल्हेर संस्थानाचे अखेरचे संस्थानिक जिवाजीराव हे माधवराव शिंद्यांचे वडील होते.


पहा : ग्वाल्हेर संस्थान; शिंदे घराणे.

संदर्भ : १. गर्गे स. मा. संपा. मराठी रियासत, भाग ५, पुणे, १९९०.
२. सरलष्कर, वि. द. संपा. त्रैमासिक : भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे, अंक १-४,
शके १९१५-१६, मार्च १९९५.
marathivishwakosh.in/khandas/khand17/index.php?option=c...
Nearby cities:
Coordinates:   17°38'47"N   74°13'43"E
This article was last modified 10 years ago