भारतीय वन संशोधन संस्था (देहरादून)

India / Uttaranchal / Dehra Dun Cantonment / देहरादून / National Highway 72 (Ambala-Haridwar)
 विद्यापीठ, अरण्य, scientific research institute / centre (en)
 Upload a photo

निसर्गरम्य हिमालयाच्या कुशीमध्ये ४५० हेक्टर क्षेत्राच्या मध्यावर उभी असलेली संस्थेची इमारत म्हणजे रोमन ब्रिटिश स्थापत्य कलेचा एक आविष्कार आहे म्हणूनच तिला जागतिक वारसाचा दर्जा प्राप्त आहे. संपूर्ण विटांचे बांधकाम, उंच खांब आणि शेकडो कमानींनी नटलेले विस्तीर्ण कॉरिडॉर हे इमारतीचे वैशिष्टय़ आणि सभोवतालची हजारो ‘कापूर’ वृक्षांची शतकी आयुष्यमान प्राप्त झालेल्या झाडांची भर यामुळे मानव निसर्गाची अनोखी मत्री पाहण्यास प्रतिवर्षी हजारो देशी आणि विदेशी पर्यटक येथे येत असतात. वन अभ्यासकांसाठी येथील सात संग्रहालयांची दालने म्हणजे मौल्यवान खजिना आहे. जंगलांमधील लाकडांची विविधता, कीटकांचे विश्व, वृक्षापासून मिळणारी विविध उत्पादने, कागद आणि रेशीमनिर्मिती यांच्या चित्ररूप नसíगक प्रतिकृती भारतीय जंगलांची श्रीमंती दर्शवितात. या संस्थेत वनविषयक पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणसुद्धा दिले जाते. २००७ पासून या संस्थेस स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा प्राप्त आहे. येथील विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय पातळीवर होते. या संस्थेमधील काही अभ्यासक्रमांना जगभरातून मागणी आहे. त्यामध्ये जैवविविधता, लाकूडनिर्मिती विज्ञान, कागदनिर्मिती, पर्यावरण संरक्षण आणि व्यवस्थापन यांचा प्रामुख्याने अंतर्भाव आहे. भारतीय वनसेवेत निवड झालेले शेकडो अधिकारी याच संस्थेने दिलेले आहेत. संग्रहालयातील वृक्षांचे नमुने, येथील वनस्पती उद्यान आणि ग्रंथालयामधील पुस्तकांचे अफाट विश्व पाहून डोळे दिपून जातात. वनशिक्षण, संवर्धन आणि संरक्षणाच्या शिक्षणाबरोबरच या संस्थेत जागतिक दर्जाचे संशोधनसुद्धा सातत्याने चालू आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   30°20'31"N   77°59'59"E
  •  9 किमी.
  •  37 किमी.
  •  60 किमी.
  •  121 किमी.
  •  122 किमी.
  •  122 किमी.
  •  122 किमी.
  •  123 किमी.
  •  138 किमी.
  •  161 किमी.
Array
This article was last modified 8 वर्षांपूर्वी