बुंदेलखंडमधील बांदा कारागृहाची ही व्यथा (बांदा)

India / Uttar Pradesh / Banda / बांदा
 Upload a photo

रघुनाथ प्रताप सिंह उर्फ राजा भैया हे नाव डीएसपीच्या हत्येने पुन्हा एकदा चर्चेत आले असले तरी उत्तर प्रदेशमधील एका कारागृहामध्ये गेली १० वर्षे राजा भैया या नावाची प्रचंड दहशत आहे. या दहशतीमुळेच या कारागृहाच्या पोस्टींगवर जायला कोणीही अधिकारी धजावत नाही. पोलिसांपेक्षा कैद्यांचाच खाक्या येथे जास्त चालतो.
बुंदेलखंडमधील बांदा कारागृहाची ही व्यथा आहे. या कारागृहात २००२-२००३ मध्ये 'पोटा' कायद्याखाली राजा भैयाला ठेवण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत या कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी राजा भैया या नावाचा धसका घेतला आहे. या कारागृहामध्ये १०९८ कैदी ठेवण्याची व्यवस्था आहे. कैद्यांची ही संख्या पाहता किमान ११० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गरज आहे, मात्र प्रत्यक्षात ३४ अधिकारी-कर्मचारीच या जेलचा गाडा हाकत आहेत.
बांदा कारागृहामध्ये बदली म्हटले की आधीच पोलीस अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकते. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार एक कारागृह अधिक्षक, ३ उप अधिक्षक आणि साठहून अधिक कर्मचाऱ्यांची पदे २००३ पासून रिक्त आहेत. मात्र आजपर्यंत त्या जागा भरण्यात आलेल्या नाहीत. मायावती यांचे सरकार असताना या येथे डझनभर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, मात्र त्यापैकी एकाही अधिकाऱ्याने तेथे रुजू होण्याचे धाडस केले नाही.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   25°29'5"N   80°19'35"E
  •  127 किमी.
  •  127 किमी.
  •  140 किमी.
  •  171 किमी.
  •  248 किमी.
  •  260 किमी.
  •  281 किमी.
  •  325 किमी.
  •  328 किमी.
  •  404 किमी.
Array
This article was last modified 11 वर्षांपूर्वी