वडूज
Liechtenstein /
Vaduz /
World
/ Liechtenstein
/ Vaduz
/ Vaduz
जग / लिश्टनस्टाइन
नगर क्षेत्र, देशाची राजधानी शहर
अवघी ४७००९ लोकसंख्या आणि १६१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या लिंचेस्टाइनचा बहुतेक भाग डोंगराळ आहे. आल्प्स् पर्वतरांगांच्या कुशीतील लिंचेस्टाइनची राजधानीचे नाव आहे 'वडूज.' या पिटूकल्या देशातील इवल्याशा राजधानीत आपण पायीच फिरू शकतो. पण सिटी टूर करायला इथे 'टॉय ट्रेन'सुद्धा उपलब्ध आहे. अवघ्या तासाभरात ही ट्रेन वडूजची सैर पूर्ण करते. आम्ही मात्र पायीच या मुक्त निसर्गसौंदर्याचा रसास्वाद घेतला. अगदी आटोपशीर देश, मर्यादीत लोकसंख्या व पर्यटकांची सदैव वर्दळ. त्यामुळे इथले लोक खूपच आनंदी, सुखी व अतिथ्यशील आहेत. ठिकठिकाणी कॉफीशॉपमध्ये बसलेल्या लोकांच्या हास्यविनोदावरून त्याचा प्रत्यय वारंवार येत होता. वडूजचे 'स्टार अट्रॅक्शन' आहे तिथल्या प्रिन्सचा कॅसल अर्थात राजवाडा. एवढ्याशा देशातील प्रिन्सचा किल्लेवजा राजवाड्याला 'अप्रतिम' एवढं एकच संबोधन पुरेसं आहे. संपूर्ण वडूजवर लक्ष ठेवणारा, डोंगरावरील प्रिन्सचा कॅसल व त्याखालच्या वाइनरीमध्ये लागलेले द्राक्षांचे मळे, हे दृश्य मनमोहक असते.
वडूजला 'सोव्हिनिअर शॉप्स'ची रेलचेल आहे. काही ब्रॅडेंड वस्तुंची दुकानेसुद्धा येथे आहेत. स्विस घडाळ्यांचा हा भाग वाईन्ससाठी पण लोकप्रिय आहे. अस्सल दर्दींसाठी वडूज म्हणजे पर्वणीच. कारण तिथे फ्री वाइन टेस्टिंगची सोय (?) आहे. फक्त त्यांची तुमची वेळ जुळायला हवी. वडूजमधले 'गॅलिना फाल्कन सेंटर' पक्षीप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरू शकते. तिथे राजबिंडा गरुड, ससाणा, इत्यादी शिकारी पक्षी अगदी जवळून बघता येतात.
टेन्शन फ्री, रिलॅक्स्ड सुट्ट्यांसाठी लागणारे सर्व काही वडूजमध्ये आहे. सुंदर हवा, छोटेसे सिटी सेंटर, छान कॅफेटेरिया आणि हायकिंग ट्रेल्स. हायकिंगसाठी इथे सुंदर स्कायलिफ्ट देखील आहे. या चेअरलिफ्टने आपण २००० मीटर उंचीच्या सारेसर यॉक डोंगरावरून अनेक हायकिंग ट्रेल्सचा आनंद घेऊ शकतो. विशेष म्हणजे इथे जाण्यासाठी शेंजेन व्हिसा चालतो. जो युरोपमधील इतर अनेक देशांमध्ये उपयोगी पडतो. युरोपचे निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल तर एकदा तरी लिंचेस्टाइनला भेट द्यायलाच हवी.

अक्षांश-रेखांश : 47°8'18"N 9°31'0"E