Pandarpawni Waterhole

India / Maharashtra / Bhadravati /
 फोटो अपलोड करें

वनखात्याची जीप ताडोबाच्या जंगलात शिरली. वनमंत्री पतंगराव ड्रायव्हरच्या बाजूलाच बसले होते. जीप जंगलात शिरल्या शिरल्या ते ड्रायव्हरला म्हणाले, 'वाग दिसला का जीप थांबवायची बर्का. पण थांबवायची म्हंजी बन नाही करायची. ते तुजं घुर्र घुर्र सुरूच ठिव, यखादा बाबा आला आंगावर धावून तं पुन्ना किल्ली कवा फिरवणार आन् गाडी चालू कवा करणार...सुटकंचा मार्ग खुला ठिवला पायजे कवाबी. कळलं का?' ड्रायव्हरनं मान हलवली. पतंगरावांनी सफारीचा शर्ट एका हातानं वर उचलला,कंबर उंचावत ते एका बाजूला वाकले आणि दुसऱ्या हातानं त्यांनी पँटच्या पट्टयाचं बक्कल काढून पट्टा बाहेर ओढला. ते पाहून ड्रायव्हर आणि मागे बसलेला अधिकारी दोघेही धास्तावले. शेवटी न राहवून अधिकारी म्हणाला,'साहेब, पट्ट्यानं वाघाला मारायचा विचार करू नका. ते नाही जमणार.' पतंगरावांनी डोळ्यांवरचा गॉगल काढून सफारीनं पुसला आणि अधिकाऱ्याकडेपाहून ओरडले, 'पँट झाली घट आन बसलं का रग लागते पोटाला, पट्टा काडून ठिवला का आराम पडतू जरा, उगा वनमंत्री झालो का काय मी? वागाला पट्टयानं मारायला.' अधिकारी हातातली गन सावरत गप्प बसला. चहूबाजूने उन्हाच्या झळा अंगावर येत
होत्या. मानेभोवती टाकलेला पांढरा शेला काढून पतंगरांवांनी घाम पुसला आणि म्हणाले, 'यवड्या उन्हात कस्काय ऱ्हातात बुवा '
अधिकारी म्हणाला, 'आधी भयंकर त्रास व्हायचा सर उन्हाचा, आता सवय झाली आम्हाला.'पतंगरांवांनी हातातील पाण्याच्या बाटलीतला एक घोट घेतला, बाटली बाजूला ठेवली आणि बोटातल्या अंगठीशी चाळा करत म्हणाले, 'तुला नाही म्हणलो मी.
वागांना म्हणलो, यवड्या उन्हात कस्काय ऱ्हातात म्हणून. तुला पगार मिळतू हितं ऱ्हाण्याचा, त्या वागाला बिचाऱ्याला काय चार पैसं देतं व्हय कुणी? आन ऱ्हातंच्या ऱ्हातं तर लोक आपले दिसला का ठिशॅव ठिशॅव करतात. त्याची बातमी आली छापून का निसती बोंबाबोम. वाग मारला... वाग मारला. आरं, वाग हायती आन वागिनीबी हायती. मंग वाग येतीलकी आनकी, त्येंना जरा येकटं सोडलं का वाडंल त्येंची संक्या. पर हितं दम कुणाला हाय. ए डायवर, दिसला वाग तं थांबिव बाबा. आन ते तुजं घुर्र घुर्र बन करू नको.' जंगलात जणू वणवा पेटला होता. सगळीकडे हिरवंगार असूनही थंडाव्याचा जराहीअंश हवेत नव्हता. पतंगरावांना भट्टीत पडल्यासारखं वाटत होतं. अधिकारी नम्रतेचा कळस गाठण्याचा प्रयत्न करीत म्हणाला, 'सर आपण जंगलातून एक फेरफटका मारून गेस्ट हाऊसकडे जायचं की थेट जायचं? जेवण तयार आहे तिकडे.'गाडी हाणा जरा जंगलाकडं, पण लय लामचा रस्ता नको. आन तो पोचर का काय म्हणतात तो दिसला का गोळी हाणायची थेट. आर्डर काडली आहे मी. बंदूक चालते
ना तुमची? का नळी घिऊन फिरताय नुसती?' चालते सर. पण ते शिकारी असे दिवसा दिसणार नाहीत. ते रात्री उशिरा
येतात. आणि वाघ पण असे दिवसाढवळ्या दिसण्याची शक्यता नाही सर. उन्हाचे ते आत खोलवर जातात थंडाव्यासाठी.'' बरं, काड जरा गाडी जंगलाच्या काठाकाठानं, ते वागांची जनगन्ना की काय ते झाली का ?'' सुरू आहे सर, वाघ दिसला की आम्ही त्याला आता एक चीप बसवतो, म्हणजे त्याचा ट्रॅकपण ठेवता येतो.'' चीप गीप काही नाही, चांगलं म्हागाचं बसवा, मी फंड करतो मंजूर, आन ट्रक नको, चांगली एसी गाडी लावा. यवडी बोंबाबोम झाली तरी तुमचं आपलं चीप चीप चाल्लंय.'' चीप म्हणजे...'' गप बसा तुमी, कळती मला चीप. आर्धा तास झाला, वागाचं शेपूटबी दिसायचा पता न्हाय, हायेत का नाही चार दोन वाग शिल्लक?'' सर, ते असे दिसत नाहीत दुपारी वगैरे... आपण रात्री जाऊ या, मी दाखवतो तुम्हाला वाघ.'
' असं म्हणतोस, ए डायवर गाडी हान गेस्टहाऊसकडे...'जीप गेस्ट हाऊसकडे निघाली. रस्त्यात अचानक पॉश गाड्यांचा ताफा आडवा आला. पतंगरांवाना पाहून तो थांबला. एका गाडीतून राज ठाकरे उतरले. गॉगलमधून पतंगरावांना न्याहाळत त्यांनी त्यांच्या सफारी ड्रेसकडे पाहिले आणि म्हणाले, 'काय पंतगराव, टायगर सफारी का?' पतंगरांवानी राजच्या कोटीकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाले, 'वाग बगायला बांद्यात जायचं सोडून हितं कशाला हिंडताय उनाचं. काय चीप बसवायची आसंल त तितंच बसवा म्हंजी सगळ्या हालचाली घरबसल्या कळतील. आन झालं फिरून का या गेस्ट हाऊसवर, किती माणसांचं सांगू बनवायला?'या माणसाच्या तोंडी लागणं कठीण आहे, हे राजच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला. त्यांचा ताफा निघाला.वनखात्याच्या गेस्टहाऊसवर मस्त बेत झाला. साहेबांना जंगलाची, वाघांच्यासंख्येची, शिकाऱ्यांची माहिती देण्यात आली. वाघांचे रक्षण करण्यात काय समस्या आहेत त्यांचा पाढा वाचण्यात आला. पतंगरावांनी, 'मी फंड कमी पडू देणार नाही, पर पुन्ना वाग मेल्याची बोंबाबोम व्हाया नको', अशी सक्त ताकीद दिली. रात्र वाढली, शांतता भयाण झाली. लठ्ठ्या आणि घारी हाडे चघळततिथेच टाइमपास करत होते. अधिकाऱ्याने पतंगरावांना विचारले, 'साहेब गाडी किती वाजता काढायची, आता तासाभरात वाघ निघतील पाणवठ्यावयायला.'
पतंगरांवांनी तिथं फिरत असलेल्या घारी आणि लठ्ठ्याकडे पाह्यलं आणि म्हणाले, 'आसेच दिसत आसतील ना वाग, जरा आंगात जास्त आसतील यांच्यापेक्षा आन उंचीनं बरे आसतील. हे बी त्याच फॅमिलीतले हायेत की. फॅमिलीतल्या येका
मेंबराला पाह्यलं काय आन धा मेंबरांना पाह्यलं काय, सारकंच. आन ध्यानात ठिवा, आपण वागांची नर-मादीची जोडी पायली... झोपा गुमानं आता.' मग निजानिज झाली.
दूर खोलवर जंगलात शिल्लक १७७ वाघांची सभा भरली होती. सगळे गंभीर होते. एक
वाघ तिथल्या एका दगडावर चढून बोलू लागला...' गेल्या महिनाभरात अपघात, खून, मारामाऱ्या, रोगराई यांनी ८५१७ माणसे
मृत्यमुखी पडली. माणसांची संख्या अशीच झपाट्याने कमी होत राहिली तर निसर्गाचा समतोल बिघडेल. यावर तातडीने काहीतरी केले पाहिजे. मानवी वस्तीत जाऊन पाहणी केली पाहिजे...'जवळच झाडाखाली बुंध्याजवळ बसलेल्या लठ्ठ्याने घारीकडे पाहिले आणि तो हसला. घारी म्हणाली, 'झोप आता. पतंगराव आणि राजही झोपले असतील.'
आसपास के शहर:
ध्रुवीय निर्देशांक:   20°22'7"N   79°18'10"E
  •  106 कि.मी.
  •  173 कि.मी.
  •  208 कि.मी.
  •  230 कि.मी.
  •  255 कि.मी.
  •  441 कि.मी.
  •  456 कि.मी.
  •  470 कि.मी.
  •  672 कि.मी.
  •  798 कि.मी.
इस लेख को अंतिम 12 साल पहले संशोधित किया गया था