कवठे (येमाई)

India / Maharashtra / Sirur /
 temple, village
 Upload a photo

कवठे गावास ऐतिहासिक वारसा ही लाभलेला असून गावाजवळून वाहणाऱ्या घोडनदीच्या किनारी पुर्वी हे गाव वसलेले होते, अशी अख्यायीका आहे. आज ही या परीसरात सुस्थीतीत व पुर्णत: दगडी बांधकाम असणारी ऐतिहासिक फत्तेश्‍वर, महादेव, विठ्ठल-रखूमाई, भैरवनाथ ही मंदीरे इतिहासाची साक्ष देत ऊभी आहेत. गावात ही हनुमान, विठ्ठल-रखुमाई ही मंदीरे त्याच काळातील असून पवार संस्थानिकांचा भव्यदिव्य राजवाडा ही चार बुरुंज व तटबंदीसह ऊभा आहे. त्याच्या दर्शनी भागातील कलाकुसर अत्यंत विलोभनिय असून, राजवाडा बाहेरुन तरी सुस्थीतीत आहे. सातारच्या कै. सुमित्रा राजे भोसले यांचे कवठे गाव हे माहेर.

गेल्या १०० वर्षांपासुन येथील कदम (तांबटकर) यांचे कलाकुसर युक्त पोलादी अडकित्ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. कलावंतांची भूमी म्हणून ही कवठे गाव उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असून तमाशा सम्राट बाबुराव कवठेकर यांचे पुत्र विठ्ठल कवठेकर, राज्य पुरस्कार विजेते व भारताचे उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते गौरवलेले प्रसिद्ध ढोलकीपटू गंगारामबुवा कवठेकर, कवी चंदूलाल (निजामशेठ मोमीन), ज्यांनी उभ्या महाराष्ट्रातील तमाशा फडांसाठी गिते लिहून राज्यभर गितांना प्रसिद्धी मिळवली ते शाहीर बी. के. मोमीन कवठेकर (चाकणचे प्रा. दिलिप कसबे यांनी नुकतीच मोमीन कवठेकर यांच्या लेखण साहित्यावर ४ वर्षे अभ्यास करीत, पुणे विद्यापिठात प्रबंध सादर करीत पी.एचडी पदवी मिळवली आहे.) सर्व परीचित आहेत. आकर्शक व कलाकुसुरयुक्त भव्य बांधलेले श्री पार्श्‍वनाथ (जैन) मंदीर व अद्ययावत व्यापारी पेठा यामुळे कवठे गावची रचना मोठी सुंदर वाटते.
Nearby cities:
Coordinates:   18°53'32"N   74°10'36"E

Comments

  • long historic place it's rulled by Dhar Pawar raje. yemai mata mandir also very well known
  • i like this
This article was last modified 12 years ago