करमरकर शिल्पालय,सासवणे गाव

India / Maharashtra / Uran /
 वस्तुसंग्रहालय  गट निवडा

' गेट वे ऑफ इंडिया ' बंदरावरून मांडवा बंदराकडे जाणारी बोट पकडली. या प्रवासात सीगल पक्षीही होतेच. तासाभराच्या प्रवासानंतर मांडवा बंदर गाठलं. हलकासा नाश्ता केला. बंदराला लागूनच रिक्षा उभ्या होत्या. त्यापैकी एक ' टमटम ' आम्ही करमरकर शिल्पालयाला जाण्यासाठी ठरवली. माझी उत्सुकता वाढली होती. काही वेळातच आम्ही सासवणे गावात पोहोचलो. तिथे समुद्र किनारी वसलेलं हे गाव. या गावातच स्वर्गीय नानासाहेब करमरकर यांनी हे शिल्पालय उभं केलं. बंगल्याच्या अंगणात प्रवेश करताच आम्हाला उजवीकडे शिल्पकारांचा विश्वासू नोकर ' मोरू ' याचे हुबेहुब शिल्प दिसलं , तिथेच पुढे म्हैसही होती. त्यांनी पाळलेली ' आल्सेशिअन ' कुत्री , याच गावातली १३ वर्षाची कोळी मुलगी अशी सिमेंटने तयार केलेली शिल्प पहिली. सकाळच्या कोवळ्या उनात आणि शांत वातावरणात त्यांचा जिवंतपणा दिसून येत होता. तसेच पहिल्या मजल्यावरही जवळपास २०० लहान शिल्पं आम्ही पहिली. शिल्पालय पाहून झालं.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°47'1"N   72°51'57"E
  •  46 किमी.
  •  94 किमी.
  •  167 किमी.
  •  277 किमी.
  •  475 किमी.
  •  583 किमी.
  •  785 किमी.
  •  815 किमी.
  •  880 किमी.
  •  960 किमी.
This article was last modified 12 वर्षांपूर्वी