अ‍ॅम्बी व्हॅलीत भारतमातेचा पुतळा (Ambavane)

India / Maharashtra / Lonavale / Ambavane

या प्रकल्पाच्या दर्शनी भागातच असलेला भारतमातेचा भव्य पुतळा. यांचे भारतमातेवर गाढ प्रेम. आता भारतमातेवर प्रेम याचा अर्थ भारतावरही प्रेम असा काढल्यास ते चुकीचे ठरणार नाही. त्याच देशप्रेमापोटी बहुधा त्यांनी जे काही करायला नको ते केले असावे. याची जाणीव झाल्यानेही कदाचित त्यांना भारतमातेच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन पापक्षालनाची गरज वाटली असावी. वजनात मारणारे नंतर शिर्डी वा अन्य ठिकाणी कोणा महाराज वा बापूंच्या अंगावर सोनेनाणे चढवतात, तसेही असेल. कारण काहीही असो. परंतु सहाराच्या अ‍ॅम्बी व्हॅलीत भारतमातेचा पुतळा प्रवेशद्वाराशीच आहे. शुभ्र वस्त्रांकित, केस मोकळे, कंबरपट्टय़ाने बांधलेली साडी, डोक्यावर मुकुट, हाती गर्जना करीत धावून जाणाऱ्या चार (चारच का, सहा किंवा आठ वगैरे का नाही हे कळावयास मार्ग नाही.) सिंहांच्या रथाची दोरी आणि मागे भारताचा तिरंगा अशी ही भारतमाता अ‍ॅम्बी व्हॅलीत येणाऱ्याजाणाऱ्याचे लक्ष वेधून घेते. ही भारतमातेची मूर्ती आणि सहारा अ‍ॅम्बी व्हॅलीत जे काही चालते त्याचा आणि या व्हॅलीत घरे असणाऱ्यांच्या वृत्तीचा खरे तर काहीही संबंध नाही. तरीही तिची तिथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. ती का, या प्रश्नाचे उत्तर सहाराश्री यांच्या मातृभूमीवरील प्रेमात सापडू शकेल. खरे तर या अ‍ॅम्बी व्हॅली प्रकल्पास सर्वच एकापेक्षा एक देशभक्तांची साथ लाभली. हा प्रकल्प जेव्हा आकारास येत होता तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना व भाजप या पक्षांचे सरकार होते. हे दोन्हीही पक्ष तसे देशाभिमानीच. त्यांचे भारत आणि भारतमाताप्रेम लक्षात न घेता त्या वेळी त्यांच्यावर सर्व नियम धाब्यावर बसवून प्रकल्पास मंजुरी दिली जात असल्याचा आरोप झाला. पण या पक्षांचे भारत आणि भारतमाताप्रेम इतके सच्चे की त्यामुळे यातील एकही आरोप त्यांना चिकटला नाही. त्या वेळी सर्व विरोध डावलून हा प्रकल्प रेटला गेला आणि सर्व देशप्रेमी धनिकांना आणि तसेच भारतमातेस हक्काचे घर मिळाले.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°36'19"N   73°23'4"E
  •  37 किमी.
  •  77 किमी.
  •  166 किमी.
  •  304 किमी.
  •  525 किमी.
  •  529 किमी.
  •  736 किमी.
  •  772 किमी.
  •  844 किमी.
  •  912 किमी.
This article was last modified 7 वर्षांपूर्वी